मुख्य बातमीसाहित्य-कला

आर्ट सर्कल फाउंडेशनच्या वतीने रविवारी गझल आख्यानाचे आयोजन

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉ. आशिष मुजुमदार यांची उपस्थिती

रत्नागिरी : आर्ट सर्कल फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉ. आशिष मुजुमदार यांच्या गझल आख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या (२२ डिसेंबर) सायंकाळी ५ वाजता शहरातील शर्वाणी हॉल येथे होणार आहे.

गझल म्हणजे काव्य प्रकारातील काळजाच्या जवळचा विषय. पण गझल हे तंत्र आहे. तो जितका हळवा काव्यप्रकार आहे तितकाच व्याकरण शास्त्रातील एक अभ्यासाचा भाग आहे. गझल गायन हीदेखील एक अभ्यासाची मखमली शाखा आहे. याच अभ्यासाची गंमत आहे डॉ. आशिष मुजुमदार यांच्या गझल आख्यान या सुरेख शब्द मैफिलीत. गझल म्हणजे काय, गझल आणि कविता यातला फरक, गझलियत, शेर, संगीतबद्ध करताना केलेला विचार या सगळ्या गोष्टी या आख्यानात डॉ. मुजुमदार उलगडून दाखवला आहेत.

डॉ. मुझुमदार यांनी अनेक कविता, गाणी आणि गझला संगीतबद्ध केल्या आहेत. त्यातील सोबतीचा करार ही तर विशेष उल्लेखनीय यशस्वी मैफल आहे. गझलकार, कवी, गायक, आणि गझलप्रेमी सर्वांनी एकत्र आनंद घ्यावा अशी ही मैफल आहे. धकाधकीच्या दैनंदिन जीवनात उत्तम आणि समृद्ध आयुष्य जगायला शिकवणारी गझल अनुभवायला रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन आर्ट सर्कलतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button