मुख्य बातमी

तुमच्यामुळे इतरांचे जीवन प्रसन्न होत असेल तर तुमचं जीवन सर्वोत्तम आहे : प्रणाली निमजे

ऑफ्रोह महिला आघाडीचा महिला मेळावा संपन्न

रत्नागिरी : तुमचे जीवन उत्तम आहे. तुम्ही प्रसन्न आहात. पण तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूचे इतर लोकं जर प्रसन्न होत असतील तर तुमचं जीवन सर्वोत्तम आहे. चार वर्षांत ऑफ्रोहने केलेले काम कौतुकास्पद आहे. वर्षानुवर्षे संघटना काम करतात पण यश मिळत नाही; मात्र ऑफ्रोह आणि आपल्यामध्ये ती शक्ती आहे. त्यामुळेच हे यश मिळाले आहे,असे गौरवोद्गार अभिनेत्री आणि महावितरण रत्नागिरी परिमंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन विभाग) सौ. प्रणाली निमजे यांनी काढले.

ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महिला आघाडी शाखा रत्नागिरीच्या वतीने नुकताच कुवारबाव (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा अनघा वैद्य होत्या. या महिला मेळाव्यात ‘राजमाता जिजाऊ व सध्याची परिस्थिती’ या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान, हळदीकुंकू कार्यक्रम व सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ऑफ्रोहचे सभासद टिकून रहा. माझे काम झाले आहे. आता माझा प्रश्न सुटलाय.bआता मला काय करायचे आहे समाजाशी, असा विचार डोक्यात न आणता पुढे आपण आपल्या येणाऱ्या पिढीचा प्रश्न हाती घेवू या, त्यांना न्याय मिळवून देवू या, असे आवाहन यावेळी ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा अनघा वैद्य यांनी दिली.

या मेळाव्याला केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व कोळी महादेव समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या मीरा कोलटेके, तर प्रमुख प्रबोधनात्मक व्याख्याते म्हणून ऑफ्रोह सातारा महिला आघाडीच्या पदाधिकारी राणी जाधव, ऑफ्रोह महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष प्रिया खापरे, राज्य सचिव नीता सोमवंशी, कोषाध्यक्ष वंदू डेकाटे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेखा धकाते, गुहागर तालुक्यातील आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके, वेळंबच्या सरपंच समीक्षा बारगोडे, २६ जानेवारी रोजी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या पोमेडी बु.च्या सरपंच ममता जोशी,

रायगडच्या जिल्हाध्यक्ष राजश्री बंदरी, कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्ष संगीता गोलाईत, साताराच्या जिल्हाध्यक्ष अंजली बेसके, ठाणेच्या जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष उषा पारशे, ऑफ्रोह उपाध्यक्ष नंदा राणे, ठाणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्मिता भोईर, इंदू सहारकर, कुंदा सोनपरोते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ऑफ्रोह साताराच्या महिला आघाडी पदाधिकारी श्रीमती राणी जाधव यांचे “राजमाता जिजाऊंचे हिंदवी स्वराज्य स्थापनेतील स्थान व सध्याची परिस्थिती” या विषयावर अत्यंत प्रभावी व्याख्यान झाले. याप्रसंगी प्रिया खापरे, मीरा कोलटेके, सरपंच वैष्णवी नेटके, ऑफ्रोह महिला आघाडी कोषाध्यक्ष वंदू डेकाटे आदींनी आपले विचार मांडले.

ऑफ्रोह महिला आघाडीच्या ठाणे, रायगड, सातारा, कोल्हापूर जिल्हाध्यक्षांसह ठाणे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी, सचिव घनश्याम हेडाऊ, साताराचे ऑफ्रोहचे मार्गदर्शक सुरेश गायकवाड, ऑफ्रोह राज्य प्रसिध्दीप्रमुख व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांच्यासह ऑफ्रोहचे विविध जिल्हा व राज्य पदाधिकारीही उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुहागर तालुक्यातील कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदान देणारे गुहागर पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी तसेच ऑफ्रोहचे राज्य प्रसिध्दीप्रमुख, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांचा स्वेच्छानिवृत्तीबद्दल ऑफ्रोह महिला आघाडीतर्फे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऑफ्रोहच्या माजी उपाध्यक्ष सिंधु सनगळे यांनी केले. ऑफ्रोह रत्नागिरी सचिव किशोर रोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑफ्रोह रत्नागिरीतील महिला आघाडी कार्याध्यक्ष राजकन्या भांडे, उपाध्यक्ष सुनंदा फुकट, सचिव स्वाती रोडे, सहसचिव प्रतिभा रोडे, ऑफ्रोह कार्याध्यक्ष बापुराव रोडे, कोषाध्यक्ष सतीश घावट यांच्यासह अनेक सभासदांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button