Uncategorized

राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात रक्तदान शिबीर 

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने युवा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

रक्तदान केलेल्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्राचे वितरण करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये

त्यामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सध्या शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताची कमतरता जाणवत आहे. तातडीने रक्ताची गरज भासल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना रक्ताची तसेच रक्तदात्याची शोधाशोध करावी लागत आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतूनच संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरातून ३० रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. यावेळी शासकीय रुग्णालयाकडून शिबिरासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांनी केले. यावेळी एस. एम. जोशी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थी तसेच हॉस्पिटल स्टडीजचे (हॉटेल मॅनेजमेंट विभाग) चे विद्यार्थी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी, प्रा. तेजस्विता पवार आणि स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button