मुख्य बातमी

प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची तत्काळ अंमल बजावणी करा

रत्नागिरी मनसेची आक्रमक भूमिका

रत्नागिरी : शहरासाठी प्रलंबित असलेल्या घनकचरा प्रकल्पासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेने नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेवून निवेदन दिले. या प्रकल्पाची तत्काळ अंमलबजावणी करा, नाहीतर मनसे ठिय्या आंदोलन करेल, असा निर्वाणीचा इशाराही यावेळी दिला.

गेली दोन वर्षे रत्नागिरी शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घनकचरा प्रकल्पाची निर्मिती व्हावी म्हणून मनसे सातत्याने पाठपुरावा करत आहे. यासाठी आज मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.रत्नागिरीतील जे. के. फाइल्स, साळवी स्टॉप, छत्रपती शिवाजीनगर आदी परिसरातील जनतेला डम्पिंग ग्राउंडवरील दुर्गंधी तसेच हवा प्रदुषणापासून कायम स्वरूपी मुक्ती मिळावी यासाठी या प्रकल्पाची नितांत गरज आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आश्वासन नगर पालिका प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.

याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव, तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, महिला सेना तालुका सचिव सौ. आकांक्षा पाचकुडे, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर, तेजस नागवेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button