
रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे देवरुख येथून १ सिंगल बॅरल काडतूसची बंदूक, ६ जिवंत काडतुसे तसेच ३ वापरलेली काडतूसे असा एकूण ३६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
४ जानेवारी रोजी संगमेश्वर-देवरुख रस्त्यावरील मौजे ताम्हाणे या गावी संदीप शांताराम रेवाळे (वय ४८ वर्षे, रा. ताम्हाणे, ता. संगमेश्वर) यांच्या ताब्यातून १ सिंगल बॅरल काडतूसची बंदूक, ६ जिवंत काडतुसे तसेच ३ वापरलेली काडतूसे असा एकूण ३६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, उपनिरीक्षक शेषराव शिंदे, हवालदार सुभाष भागणे, बाळू पालकर, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे यांनी केली.



