मुख्य बातमीशैक्षणिक
५२ व्या लांजा तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

लांजा : ५२ व्या लांजा तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज (६ जानेवारी) राजापूर विधानसभा मतदारसंघांचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते पार पडले.
हा कार्यक्रम कै. रा. सि. बेर्डे विद्यालय, सापुचेतळे (ता. लांजा) येथे उत्साहात झाला. शाश्वत विकासासाठी विज्ञानाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळेस आमदार किरण सामंत यांनी केले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लोटणकर सचिव पद्माकर कोकरे उपाध्यक्ष सुधीर लोटणकर प्राचार्य अनिल गुरव विनोद सावंत, भाग्यश्री हिरवे, स्नेहा कीर, नरेंद्र पवार, सुदाम शेठ कामत, विश्वनाथ गुरव, विश्वास चौगुले यांच्यासह सर्व विभागातील सरपंच, पोलीस पाटील, सर्व संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



