मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीय

लांजा तालुक्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेते प्रवेश

लांजा : तालुक्यातील विविध पक्षाच्या  पदाधिकाऱ्यांनी आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यामध्ये आरडीसीचे संचालक मुन्ना खामकर, काँग्रेस माजी शहराध्यक्ष प्रसन्न शेट्ये, उबाठाच्या महिला शहर संघटिका छाया गांगण, वि. का. स. सोसायटीचे उपाध्यक्ष विकास चव्हाण, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरीफ नाईक, पंकज लांजेकर, बावा राणे, आरवाग उपसरपंच स्वानंद कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

यावेळी विधानसभाचे प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई, मनोहर बाईत, शहर प्रमुख सचिन डोंगरकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button