देश-विदेशमुख्य बातमी

केंद्र सरकारने काढली जनगणनेची अधिसूचना ! 

नवी दिल्ली :भारताची एकूण लोकसंख्या किती, महिला किती, पुरूष किती, कुठल्या धर्माची, कुठल्या जातींची किती लोकसंख्या आहे याची उत्तरं लवकरचं मिळणार आहे. कारण केंद्र सरकारने जनगणेनची अधिसूचना जारी केली आहे. 2011 साली शेवटची जनगणना झाली होती. त्यानंतर 2021 साली ही गणना होणार होती. परंतु कोरोनामुळे ही गणना व्हायला उशीर झाला. आता या वर्षीपासून या गणनेच्या प्रक्रियेला सुरूवात होत आहे.

ही जनगणना अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे, कारण यात नागरिकांना एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा पर्याय मिळणार आहे. तो म्हणजे सेल्फ एन्युमरेशनचा. यामध्ये नागरिक स्वतःहून आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरू शकतील.

गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला होता. गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2027 मध्ये होणारी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवली जाणार आहे. यामध्ये डेटा सुरक्षेसाठी काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत, जेणेकरून माहिती संकलन आणि पाठविण्याची प्रक्रिया सुरक्षित राहील.

जनगणना अधिनियमात 2022 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणानंतर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने स्वतःची माहिती भरता येणार आहे. ही भारताची पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे.

यासाठी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (ORGI) ने Self Enumeration Portal नावाचे वेब पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक आपल्या घरातील सर्व सदस्यांची माहिती पाहू शकतील आणि त्यात हवे ते बदल करू करू शकतील. तसेच जनगणना सुरू होण्याच्या ठरलेल्या तारखेच्या काही दिवस आधी हे पोर्टल बंद करण्यात येईल, जेणेकरून फायनल डेटा एकत्र करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button