क्रीडामुख्य बातमी

रत्नागिरीत ४, ५ जानेवारीला दैवज्ञ चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 

रत्नागिरी : दैवज्ञ चषक (वर्ष ३ रे) दैवज्ञ हितवर्धक समाज व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ आणि ५ जानेवारी २०२५ या कालावधीत दैवज्ञ हॉल, पावर हाऊस, नाचणे रोड, रत्नागिरी येथे होईल.

ही स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटांत खेळवली जाणार आहे. या वर्षातील ही सहावी स्पर्धा आहे. स्पर्धेसाठी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये, लहान गटासाठी १०० रुपये याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल. सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका १ जानेवरी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत.

तालुका प्रतिनिधी खालीलप्रमाणे आहेत. गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), देवरूख – राहुल भस्मे (९६५७६३७६७८), मोहन हजारे (९४२२०५३९४३), चिपळूण – प्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), दीपक वाटेकर (९९७५५४६६२५), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), लांजा – मनोज जाधव (७६२०११६७३६ ), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३१), राजापूर – मनोज सप्रे (९४०३७६८३७६), दापोली – माधव शेट्ये (९२०९७०९७९२).

या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरमचे राज्यस्तरीय पंच मंदार दळवी व सागर कुलकर्णी यांची निवड झाली असून, स्पर्धा प्रमुख म्हणून सचिन बंदरकर काम पाहतील. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन दैवज्ञ हितवर्धक समाजचे अध्यक्ष संतोष भुर्के, उपाध्यक्ष सुहास वीरकर, सचिव धनेश रायकर, खजिनदार गुरुप्रसाद खेडेकर, कार्याध्यक्ष संतोष खेडेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button