बारावी, दहावी परीक्षेसाठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशक नियुक्त

रत्नागिरी : परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य मंडळ सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च तसेच दहावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्र. पुढीलप्रमाणे आहेत. 9011302997, 8263876896, 8767753069, 7387400970, 9960644411, 7208775115, 8169202214, 9834084593, 8329230022 आणि 9552982115.
लेखी परीक्षेपूर्वी, परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निःशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र, विद्यार्थी, पालक यांनी परीक्षे केंद्र, बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिकेसंबंधीत प्रश्न आदीबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये, याची नोंद घ्यावी.



