मुख्य बातमी

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजना

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर

रत्नागिरी : सन २०२४-२५ मध्ये अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिलेली आहे. या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून १६ डिसेंबरपासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ असून अर्ज मा. आयुक्त, समाज कल्याण, ३, चर्च पथ, पुणे यांच्या कार्यालयात सादर करावयाचे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button