मुख्य बातमी

लायन्स क्लबकडून जि. प. शाळा निवळी तिठा येथील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी

रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी ही संस्था रत्नागिरी तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून सामाजिक, शैक्षणिक, शालेय,आरोग्य या विषयी विविध सेवाकार्य करते. त्याच अनुषंगाने आज (१७ डिसेंबर) लायन्स क्लबमार्फत जिल्हा परिषद केंद्र शाळा निवळीत तिठा रावणंगवाडी निवळी येथील १९० विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबीर घेण्यात आले.

लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. गणेश धुरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. स्नेहदीप पॅथॉलॉजी लॅबचे आणि लायन्स क्लबचे सभासद दीपक जाधव यांच्यामार्फत हे शिबीर आयोजित केले होते. यावेळी लायन्स क्लबचे सचिव विशाल ढोकळे, लायन शरद नागवेकर, केंद्रप्रमुख अरुण जाधव, मुख्याध्यापक प्रवीण देसाई, शिक्षक सौ. नाटेकर, सौ. कांबळे, सौ. कोकरे, सौ. देसाई, प्रशांत चामे, श्री. साळुंखे, सौ. पाटणकर आदी उपस्थित होते.

केंद्रप्रमुख श्री .जाधव यांनी लायन्स क्लब करत असलेल्या कामाचे कौतुक केले आणि अध्यक्ष गणेश धुरी यांचे आभार मानले. मुख्याध्यापक श्री. देसाई यांनी देखील क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी यांचे आभार मानून पुढे देखील अशा प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवावेत, असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button