एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे २६ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. ही कार्यशाळा एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात झाली.

या प्रशिक्षण कालावधीत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. आदरातिथ्य, स्वच्छतेचे महत्त्व आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या चार दिवसीय कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख ताराचंद ढोबाळे यांनी काम पाहिले. त्यांना किचन प्रमुख प्रा. मेघना शेलार तसेच प्रा. अथर्व खांडेकर यांचे सहकार्य लाभले.
या संपूर्ण कार्यशाळेसाठी कोकण रेल्वेचे सहकारी म्हणून रेश्मा शकुर तसेच प्रशांत शेट्टी यांनी काम पाहिले. या कार्यशाळेचे आयोजन कोकण रेल्वेच्या डीजीएम वैशाली पतंगे आणि ओएस दयानंद गोसावी यांनी केले होते.



