मुख्य बातमी

नवनिर्माण महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षकांसाठी आरोग्य शिबीर

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्माण महाविद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक ५ डिसेंबर रोजी झालेल्या या शिबिरात मौखिक आरोग्य, जनरल आरोग्य तपासणी, डोळे तपासणी, रक्त नमुने तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी करण्यात आली. महाविद्यालयातील सुमारे ३०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी, प्रा. हुमेरा काद्री, प्रा. निकिता नलावडे, प्रा. डॉ. पूजा मोहिते आदी उपस्थित होत्या.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशक प्राची भोसले, सचिन भरणे, श्वेता चव्हाण, तेजश्री गावकर, राम चिंचोळे, स्टाफ नर्स समीक्षा दैत, स्मिता गोठणकर, डॉ. संकेत गवड, मयुरी वारेकर, प्रतिभा पवार, आदिती सुर्वे, डॉ. प्रीती फुके यांनी तपासणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button