नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयातर्फे “स्कॉलर सर्च” जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचालित नवनिर्माण कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने फक्त १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलर सर्च ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रत्येक हायस्कूलच्या ठिकाणी ७ डिसेंबर रोजी होणार असून, अंतिम फेरी नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे १४ डिसेंबर रोजी होणार आहे.
या स्पर्धेसाठी घेण्यात येणारी परीक्षा ही ५० गुणांची असून वेळ १ तासाची असेल. परीक्षेसाठी ५० बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रश्न इयत्ता ९ वी व १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रत्येक शाळेतच होईल. प्रत्येक शाळेतील पहिले तीन क्रमांक अंतिम फेरीसाठी निवडले जातील. अंतिम फेरी ही नवनिर्माण महाविद्यालय रत्नागिरी येथे होईल.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्यास ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ हजार रुपये आणि प्रत्येकी प्रमाणपत्र देऊळ गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील पत्त्यावर अथवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा : प्राचार्य, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय, पी. ६३, एम. आय. डी. सी. मिरजोळे, रत्नागिरी (९४२०२५०९७७)
प्रा. सुकुमार शिंदे (९४२३१८९७६१)
प्रा. प्रकाश पालांडे (७०२००१८५६६)
प्रा. दीपाली तावडे (९३७०३३५९५०)
प्रा. रोहित यादव (९६५७६१६६६२)
प्रा. सचिन टेकाळे (९४०३२५७५८१)
ई-मेल आयडी : navnirmancollege@rediffmail.com



