मुख्य बातमीराजकीय

कुवारबाव येथील कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जागा त्वरित हस्तांतरित करावी : सतेज नलावडे

रत्नागिरी : शहराजवळील कुवारबाव गावासाठी कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी शासनाकडून निधी मंजूर होत असून जागे अभावी तो प्रलंबित आहे. गावचा कचऱ्याचा प्रश्न जटील बनला असून त्यामुळे सर्वत्र प्लास्टिक व दुर्गंधी पसरत आहे.

कुवारबाव यासाठी गावातील पत्रकार बंधूनीही आंदोलनाची हाक दिली होती. त्यावेळी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. गावाच्या अत्यावश्यक प्रकल्पांना जमीन हस्तांतरित करण्यास उशीर होत असल्यामुळे निषेध म्हणून यापुढे कुवारबाव गावामधे शासकीय कार्यालय व गावाबाहेरील व्यक्तींना जमिनीसाठी कोणतीही नाहरकत देऊ नये व दिल्या असलेल्या सर्व नाहरकत रद्द कराव्यात, असा ठराव ग्रामसभेला करण्यात आला आहे.

हे हस्तांतरण त्वरित करावे यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, दीपक आपटे, शामराव माने, संजय माने, रसिक कदम यांनी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची भेट घेऊन याबाबत त्वरित आदेश करण्याची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button