Uncategorizedमुख्य बातमी

नवनिर्माण हायमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक झाले दांडियामध्ये रममाण

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतेच दांडिया नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात विद्यार्थी, शिक्षक यांच्याबरोबरीने पालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रममाण होत कार्यक्रमाचा आनंद लुटला.

नवनिर्माण हायमध्ये विद्यार्थ्यांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही सहभागी करून घेतले जाते. तसेच माता पालकांसाठी पाककला स्पर्धा, मॅचिंग स्पर्धा, महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. नेहमीच्या दैनंदिन कार्यक्रमातून पालकांनाही थोडा विरंगुळा मिळावा आणि त्यांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचा आनंद लुटता यावा हा या मागचा हेतू असतो. शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांमधून शाळेमध्ये पालकांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

यंदाही नवरात्रोत्सवाचेनिमित्त साधत नवनिर्माण हाय शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दांडिया स्पर्धेचे आयोजन केले होते. यात पालकांनाही सहभागी करून घेण्यात आले. संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही दांडीया नृत्यामध्ये सहभागी होत या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.

सहभागी पालकांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने त्यांना काही बक्षीस देण्यात आली. यामध्ये बेस्ट कॉस्च्युमसाठी प्रिया मनोरकर आणि सर्वदा बेंद्रे यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. बेस्ट परफॉर्मन्ससाठी तृप्ती साखरकर आणि निलेश गराडे यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. श्रीमती काळे यांना बेस्ट स्माईल, तर बेस्ट एनर्जीचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. सीमा हेगशेट्ये, मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button