ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणीची माजी आमदार राजन साळवी यांची मागणी

राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला असून, दिलेल्या निकालावर संशय निर्माण झाल्यामुळे आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदविला असल्याची माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन साळवी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सुप्रिय कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक निकाल लागल्यानंतरही ७ दिवसांच्या आतमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार करू शकतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद वाटत असल्याने मतदान केंद्र क्रमांक २- चाफवली व २०० – तुळसवडेचे ईव्हीएम मायक्रो कंट्रोलर व व्हीव्हीपॅटची पडताळणी करून निर्माण झालेला संशय दूर करावा, असे निवेदन दिल्याची माहीती माजी आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.



