राष्ट्रीय अंजिक्यपद तायक्वांदो सब-ज्युनियर स्पर्धेत अर्थव मुरकुटेची महाराष्ट्र संघात निवड

रत्नागिरी : दिनांक २८ नोव्हेंबर ते १ डिंसेबर या कालावधीत ताऊ देवी लाल स्टेडियम, पंचकुला, हरियाणा येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय अंजिक्यपद तायक्वांदो सब-ज्युनियर स्पर्धेत रत्नागिरीतील गणराज क्लबच्या अथर्व मुरकुटेची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे आहे. या स्पर्धेसाठी २६ नोव्हेंबर रोजी अर्थव रवाना झाला.
जळगाव जिल्हा तायक्यांदो असोसिएशन तथा तायक्यांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई, यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत ३४ वी महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर क्योरोगी अंजिक्यपद तायक्यांदो स्पर्धा आणि १० वी पुमसे स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅटमिंटन हॉल येथे झाली. या स्पर्धेत क्योरोगी व पुमसे प्रकारात रत्नागिरी जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत १४ मुले व १४ मुली सुवर्णपदक विजेत्याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. अर्थव मुरुकुटे याची ५० किलोवरील वजनी गटात राष्ट्रीय स्पर्धसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
अर्थवला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच, महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने नेहमीच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे क्रीडाशिक्षिका सौ. सपना साप्ते, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी अर्थवला शुभेच्छा दिल्या.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर, जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, तसेच गणराज क्लबचे पदाधिकारी अभिजित विलणकर, नुतन कीर, रंजना मोडूंळा, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, यशंवत शेलार, पूजा कवितके, एसआरकेचे प्रशिक्षक शाहरुख शेख, जयभैरीचे प्रशिक्षक मिलिंद भागवत पालकवर्ग आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.



