मुख्य बातमी

विभागीय डाक अदालत ९ डिसेंबर रोजी 

५ डिसेंबरपर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन

विभागीय डाक अदालत ९ डिसेंबर रोजी

 

रत्नागिरी : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय यांच्या वतीने ९ डिसेंबर रोजी अधीक्षक डाकघर, रत्नागिरी चे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी येथे दुपारी ३ वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत आयोजित केली आहे.

इच्छुकांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे ५ डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पाठवावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.

पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button