मुख्य बातमी

आमदार भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड

गुहागर : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली. गुहागर विधानसभा मतदारसंघातून आणि संपूर्ण कोकणातून एकमेव महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विजयी आमदार भास्कर जाधव यांची विधीमंडळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

मातोश्री येथे पार पडलेल्या बैठकीमधे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थिती आमदारांची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये आमदार भास्कर जाधव यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button