मुख्य बातमीशैक्षणिक

संविधान रॅलीचे नवनिर्माण महाविद्यालयात जोरदार स्वागत

संगमेश्वर : येथील नवनिर्माण महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय यांच्या वतीने संविधान रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली नवनिर्माण महाविद्यालयात आली असता नवनिर्माण महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. रंजना चव्हाण यांच्यासह विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालय आणि नवनिर्माण महाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button