मुख्य बातमीविधानसभा निवडणूक २०२४
सानिका परशुराम निवेंडकरने लंडनवरून येऊन बजावला पहिल्यांदाच मतदानाचा हक्क

रत्नागिरी : लंडनवरून रत्नागिरी येथे येऊन सानिका परशुराम निवेंडकर हिने मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील देसाई हायस्कूल माळनाका येथील मतदान केंद्रात पहिल्यांदाच मतदान केले. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद पहावयास मिळाला.
सानिका निवेंडकर ही शिक्षणासाठी सध्या लंडन येथील ससेक्स युनिव्हर्सिटी येथे मास्टर करत आहे. यापूर्वी ती शिक्षणासाठी रत्नागिरी बाहेर होती. विधानसभेसाठी पहिल्यांदाच तिने लंडनवरून रत्नागिरी येथे येऊन मतदान केले. उद्या ती पुन्हा लंडनसाठी रवाना होणार आहे. तिचे बाबा रत्नागिरी जिल्हा परिषद येथे शासकीय सेवेत असून आई मुंबई येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहे. सानिकाने आज पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे.



