मुख्य बातमी

कै.मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा २३ व २४ ऑगस्टला

रत्नागिरी : महाराष्ट्रातील मानाची, नामांकित आणि चार दशकांची दीर्घ परंपरा लाभलेली कै.मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २३ व २४ ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन उद्या (२३ ऑगस्ट) सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात दरवर्षी आयोजित केली जाते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला आहे. ज्वलंत, निर्भीड विषय, पारदर्शक निकाल आदी वैशिष्ट्यांनी स्पर्धा राज्यभरात नावलौकिकाला आली आहे.

या वर्षी ही स्पर्धा २३ आणि २४ ऑगस्ट या दोन दिवशी होत असून २३ ऑगस्टला माध्यमिक गटाची, तर २४ ऑगस्टला कनिष्ठ महाविद्यालयीन गटाची स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा बक्षीस समारंभ २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button