मुख्य बातमीराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

बाळ माने यांच्यासाठी विनायक राऊत, भास्कर जाधव यांच्या सभा, बैठका 

रत्नागिरी मतदारसंघात महाविकास आघाडीचा जोर : १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी होणार सभा 

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. पुढील दोन दिवस या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. १३ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांची, तर १४ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांची जाहीर सभा होणार आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने निवडणूक लढवत आहे. बाळ माने यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याच पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कर्ला येथे शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता वाटद येथील जाहीर सभेत शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

दि. १४ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या जाहीर सभा होणार आहेत. सकाळी १० वाजता बसणी येथे, दुपारी १२ वाजता मिरजोळे येथे, दुपारी ३ वाजता रत्नागिरी शहरात बैठक, सायंकाळी आंबेशेत येथे बैठक आणि ७.३० वाजता सोमेश्वर मोहल्ला येथे बैठक होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button