गंधार क्रीडा महोत्सवातून “नवनिर्माण”चे विद्यार्थी राज्यस्तरावर चमकावेत : पोलीस निरीक्षक अमित यादव
संगमेश्वर नवनिर्माण महाविद्यालयाच्या गंधार क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

संगमेश्वर : येथील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता अशा प्रकारच्या क्रीडा महोत्सवांमधून समोर येत असते. नवनिर्माण महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठस्तरावर कौतुकास्पद कामगिरी करणारे विद्यार्थी गंधार क्रीडा महोत्सवातून राज्यस्तरावरही चमकावेत, अशी अपेक्षा संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी व्यक्त केली.


नवनिर्माण महाविद्यालयाच्या गंधार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, नवनिर्माण पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक किरण गुरव, रूपाली अणेराव, संतोष खरे भिकाजीराव बेहेरे, तसेच नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक, नवनिर्माण महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी संगमेश्वरसारख्या दुर्गम भागात नवनिर्माण शैक्षणिक संकुल उभारून येथील दुर्लक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिल्याचे नमूद केले. लाल मातीमध्ये खेळणारे विद्यार्थी खेळामध्ये प्रगती करतील, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले केले.

प्रास्ताविक करताना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी चेअरमन अभिजीत हेगशेट्ये आणि संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे येथील विद्यार्थ्यांना खेळामध्ये संधी मिळत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष खरे, तर आभार अनिल नेमन यांनी मानले. प्रा. प्रशांत जाधव, पृथ्वीराज वाडकर, नेहा जोईल, तेजस्विनी सावंत, पूजा बोथरे, भिकाजीराव बेहेरे, मितेश पवार, शरयू कांबळे तसेच वरिष्ठ लिपिक सिद्धेश सावंत, प्रांजल गवळी, जितेश घवाळी, महाविद्यालयाचा जीएस सुदीप मुंडे, क्रीडा प्रतिनिधी साहिल साबळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी दिया घोरपडे आधी क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे.




