महायुतीसाठी सर्वांनी एकत्र काम करायचे आहे : रवींद्र चव्हाण

दापोली : महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन दापोलीमध्ये योगेश कदम, गुहागरमध्ये राजेश बेंडल यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या काम करायचे असल्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज (६ नोव्हेंबर) महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला महायुतीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, दापोलीमध्येही कोणते वाद नाहीत. हा चुकीचा समज आहे. योगेश कदम यांना ज्या वेळेला दापोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेला महायुतीचे पदाधिकारी काम करायला लागले आहेत. राज्यात आमच्या २०० जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरी सभा झाली. या सभेबद्दल बोलताना त्यांनी आम्ही खरेतर कार्यकर्त्यांची बैठक इतकी मोठी घेतो, ती त्यांची सभा होती अशी खिल्ली भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उडवली आहे. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व त्यानंतर मी, अशी आमची धारण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री उदय सामंत आणि दापोली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार योगेश कदम उपस्थित होते.



