मुख्य बातमी

नीलेश आखाडे पुरस्कृत ऑनलाईन गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर नीलेश महादेव आखाडे आयटी जिल्हा संयोजक आयोजित ऑनलाइन गणेशोत्सव सजावट स्पर्धा रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ६ साठी घेण्यात आली होती. या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेविषयी बोलताना श्री आखाडे म्हणाले, कोकणातील सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणामध्ये मोठी धामधूम पाहायला मिळते. अनेक चाकरमानी आपापल्या गावी घरी गणेशोत्सव निमित्त येतात आणि अतिशय आनंदाने उत्साहाने श्री गणेशासाठी सजावट करून गणेश मूर्ती स्थापन करतात. त्यांचा उत्साह अधिक वाढावा यासाठी आम्ही गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. प्रत्येकानेच आपल्या बाप्पाच्या सजावटीसाठी खूप मेहनत घेतली आहे. यामध्ये क्रमांक काढत असताना कोणाला नंबर द्यावा हा प्रश्न देखील निर्माण झाला इतकी सुंदर सजावट प्रत्येकाने केली होती.

या स्पर्धेमध्ये सचिन टेकाळे (यश अपार्टमेंट, नाचणे- पॉवर हाऊस) यांनी साकारलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील देखाव्याला प्रथम क्रमांक देण्यात आला. श्रेयस अजित मयेकर (गौरेश अपार्टमेंट, पॉवर हाऊस शेजारी) यांनी साकारलेल्या स्वामी समर्थ रूपातील गणेश मूर्ती आणि वटवृक्ष देखाव्याला द्वितीय क्रमांक देण्यात आला. तसेच ऍड. विजय पेडणेकर (विश्वनगर) यांनी बाप्पासाठी केलेल्या सजावटीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाला.

या स्पर्धेमध्ये सहभागी तीनही स्पर्धकांना अनुक्रमे ३ हजार ३३३, २ हजार २२२ आणि १ हजार १११ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्वांचे आभार आणि विजयी झालेल्यांचे स्पर्धकांचे अभिनंदन श्री. आखाडे यांनी केले आहे. सर्व विजयी झालेल्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button