मुख्य बातमी

चाकरमान्यांसाठी खेड रेल्वे स्थानकातून तीन अनारक्षित ट्रेन

रत्नागिरी : गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वेने खास सोय केली आहे. खेड येथून थेट तीन वेगवेगळ्या अनारक्षित रेल्वे मुंबईसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास हा महामार्गापेक्षा रेल्वेच्या माध्यमातून सुखकर होणार आहे.

गाड्यांचा सविस्तर तपशील असा : गाडी क्र. ०१०६९/०१०७० मुंबई सीएसएमटी – खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित) : गाडी क्रमांक ०१०६९ मुंबई सीएसएमटी – खेड स्पेशल (अनारिक्षित) मुंबई सीएसएमटी येथून १२ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१५ वाजता खेडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०७० खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित) खेड येथून १६ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता सुटेल. ती गाडी त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकावर थांबेल. गाडीची रचना : एकूण २० डबे = १४ सामान्य द्वितीय श्रेणी, ४ (अनारक्षित) स्लीपर, एसएलआर – ०२.

गाडी क्र. ०१०७४/०१०७१ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष : गाडी क्रमांक ०१०७४ खेड – पनवेल अनारक्षित स्पेशल खेड येथून १३ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता सुटेल. ती ट्रेन त्याच दिवशी १० वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०७१ पनवेल – खेड अनारक्षित स्पेशल पनवेलहून १३ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबर सकाळी ११ वाजता सुटेल. ती गाडी खेडला त्याच दिवशी दुपारी २.४५ वाजता पोहोचेल.

ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर थांबेल. गाडीची रचना : एकूण २० डबे = १४ सामान्य द्वितीय श्रेणी, ४ (अनारक्षित) स्लीपर, एसएलआर – ०२.

गाडी क्र. ०१०७२/०१०७३ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष : गाडी क्रमांक ०१०७२ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजता सुटेल. ती गाडी त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०७३ पनवेल – खेड अनारक्षित स्पेशल पनवेल येथून १३ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.१० वाजता सुटेल. ती गाडी दुसऱ्या दिवशी १ वाजता खेडला पोहोचेल.

ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर थांबेल. गाडीची रचना : एकूण २० डबे = १४ सामान्य द्वितीय श्रेणी, ४ (अनारक्षित) स्लीपर, एसएलआर – ०२.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button