मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही जागा नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज : डॉ. विनय नातू

महायुतीमध्येच आपसात राजकारण; जिल्ह्यातून कमळ निशाणी हद्दपार झाली असली, तरी ती भाजप कार्यकर्त्यांच्या मनात

गुहागर : भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही जागा नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज असून, काहीजण नाराजी व्यक्त करतात तर काहीजण नाराजी व्यक्त करत नाहीत. महायुतीत राजकारण चालू आहे. रामदास कदम यांनी भागित व्यक्त केले की रामदास कदमांचा तो कुटील डाव होता याचे स्पष्टीकरण महायुतीच्या नेत्यांना द्यावे लागणार, असे विधान भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केले.

महायुतीच्या जागेचा तिढा सुटला असून महायुतीकडून राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेवर माजी आमदार डॉ. नातू हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते आणि ही जागा भाजपलाच मिळणार अशी दाट शक्यता होती; मात्र वाटाघाटीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे राजेश बेंडल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाराज असलेल्या डॉ. नातू यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींना स्पष्टोक्ती दिली.

शिवसेनेकडे मातब्बर उमेदवार असताना दुसऱ्या पक्षातून उमेदवार घेऊन तो आपला आहे हे समजायचे, असा टोला यावेळी डॉ. नातू यांनी नाव न घेता लगावला. जिल्ह्यातून कमळ निशाणी हद्दपार झाली असली, तरी ती भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही जागा नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. काहीजण नाराजी व्यक्त करतात, तर काहीजण नाराजी व्यक्त करत नाहीत. महायुती मध्येच आपापसात राजकारण चालू असल्याचे ते म्हणाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button