मुख्य बातमीराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

मंत्री उदय सामंत यांचा पाचव्या टर्मसाठी उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काल (२५ ऑक्टोबर) जोरदार शक्तीप्रदर्शन करत महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाचव्या टर्मसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात यापूर्वी चार वेळा निवडून आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मराठा मैदानावर सभा घेतली. मतदारांसाठी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, बंधू किरण सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) समन्वयक-तालुकाध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र (बंटी) सदानंद वणजू यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button