मुख्य बातमी

रत्नागिरीत १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन 

रत्नागिरी : केंद्र पुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हास्तरीय उल्लास मेळावा १७ डिसेंबर रोजी येथील मिस्त्री हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साक्षरतेच्या प्रसारासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य, व्हिडीओ यांच्या आधार स्टॉल मांडणी यासारखे विविध कार्यक्रम होणार आहेत.

सन २०२३-२४ मध्ये राज्यस्तरावर ५ लाख ७७ हजार ३३७ असाक्षर नोंदणी व ८ लाख ४ हजार ९९ इतके FLNAT परीक्षेस बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. जिल्ह्यामध्ये १३ हजार ५०५ उद्दिष्ट असून १५ हजार ५४७ नोंदणी झाली आहे. सन २०२४-२५ साठी ९ हजार ३३७ उद्दिष्ट तर ६ हजार ५८१ नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button