मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या बस वाहकाविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दापोली : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या पायाला वाईट हेतूने स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्या बसच्या वाहकाविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दाभोळ सागरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी दाभोळकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत असताना या बसचे वाहक माजीद मेहबूब तांबोळी (वय ४०) यांनी आघारी फाटा येथे बस आली असताना तू इथे उतरू नको, आपण फिरून येवू असे सांगत या मुलीला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याच वाहकाने असेच वर्तन या मुलीशी यापूर्वीही केल्याची माहिती तिने दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अनेक ग्रामस्थांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली व या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी पोलिसांकडे केली. काही वेळ मोठा तणाव निर्माण झाला होता; मात्र दाभोळ पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या मुलीच्या तक्रारीवरून वाहक माजीद मेहबूब तांबोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करणायत आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button