डमी उमेदवारांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
रत्नागिरी जिल्ह्यात १७० जागांसाठी १९ जूनपासून पोलीस भरती

रत्नागिरी : पोलीस भरतीच्या वेळी डमी उमेदवारांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलीसांनी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून, बायोमेट्रीक मशीनचा वापर करताना पहिल्यांदाच चेहरा ओळख प्रणाली या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १७० जागांसाठी १९ जूनपासून पोलीस भरती होणार आहे. यावेळी उमेदवारांनी कोणत्याही भूल थापांना बळी पडू नये, पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक असणार असल्याच माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
काल (१८ जून) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. पोलीस भरती प्रक्रिया कालावधीत भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून तसेच बोगस दलालांकडून किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींकडून ओळखीचा गैरफायदा घेऊन व तसे ओळखीचे अगर अन्य प्रकारचे आमिष दाखवून कोणी पैशाची मागणी करत असल्यास किंवा आर्थिक देवाण-घेवाणीचे गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी समक्ष किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
भरतीबाबत अधिक माहिती देताना श्रीमती गायकवाड म्हणाल्या, ”पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांसाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx याद्वारे सूचना प्राप्त झाली असेल अश्या उमेदवारांना दुसरी तारीख रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून दिली जाईल. नमूद उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या तारखेमद्धे ४ दिवसांचे अंतर राहील व त्याच वेळी पुढील तारखा दिल्या जातील, याशिवाय उमेदवारांना काही अडचण, शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा”.
“पोलीस भरती २०२२-२३ मधे ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. याबाबत काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्यांचे निरसन पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांच्यामार्फत केले जाईल,” असे त्यांनी सांगितले.
पोलीस भरतीसाठी येणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप, १०० मीटर धावणे व गोळाफेक पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदान येथे, तर १६०० व ८०० मीटर धावणे एमआयडीसी येथील मैदानावर घेण्यात येईल. १९ व २० जून रोजी प्रतिदिनी ३०० उमेदवार व जून ते १५ जुलै या कालावधीत प्रतिदिनी सुमारे ५०० इतके उमेदवारांची मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी केली जाईल. यासाठी तयार केलेल वेळापत्रक www.mahait.org यावर दिले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून उमेदवारांना प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही, तर शनिवार व रविवार हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने उमेदवारांनी पावसापासून आपला बचाव करण्यासाठी पुरेसे साहित्य जसे (रेनकोट, छत्री) आपल्या सोबत ठेवावी तसेच उमेदवारांनी स्वतःची कागदपत्रे पावसातून बचावासाठी वॉटर प्रूफ बॅग वापरावी, असेही श्रीमती गायकवाड यांनी नमूद केले.
उमेदवारांनी कोणत्याही भूल थापांना बळी पडू नये, पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक असणार आहे. तसेच पोलीस भरती प्रक्रिया कालावधीत भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून तसेच बोगस दलालांकडून किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींकडून ओळखीचा गैरफायदा घेऊन व तसे ओळखीचे अगर अन्य प्रकारचे आमिष दाखवून कोणी पैशाची मागणी करत असल्यास किंवा आर्थिक देवाण-घेवाणीचे गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी दिलेल्या पत्त्यांवर समक्ष किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
उमेदवारांना पोलीस भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास नमूद हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष WhatsApp क्रमांक : ८८८८९०५०२२,
पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी, दूरध्वनी क्रमांक : (०२३५२) २७१२५७
ई-मेल : sp.ratnagiri@mahapolice.gov.in,
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई यांचे कार्यालय, दूरध्वनी क्रमांक (०२२) २७५६३२५७,
ई-मेल : ig.kokanrange@mahapolice.gov.in
उमेदवाराकडून पैशांची मागणी करत असल्यास पुढील ठिकाणी संपर्क साधावा
पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी, सुर्वे सदन, नाचणे रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी.
फोन नंबर : (०२३५२) २२२८९३
टोल फ्री नंबर : १०९८,
ईमेल – dyspacbratnagiri@mahapolice.gov.in,
पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी, दू रध्वनी क्रमांक : (०२३५२) २७१२५७
ई-मेल sp.ratnagiri@mahapolice.gov.in,
रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष WhatsApp क्रमांक : ८८८८९०५०२२.
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई यांचे कार्यालय, दूरध्वनी क्रमांक : (०२२) २७५६३२५७
ई-मेल : ig.kokanrange@mahapolice.gov.in



