रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला विरोध
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडे

रत्नागिरी : रत्नागिरीत वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. या कार्यक्रमादरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून विरोध केला. जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. हिंदुत्ववादी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. जय श्रीरामचा नारा देत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांची धरपकड केली.
कुवारबाब येथे ७ ऑक्टोबरला वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आयोजित केला होता. त्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडला. पण वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या बाहेर उद्घाटनासाठी जाणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. यामुळे पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाहेर आले. त्यावेळी देखील आंदोलकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी रत्नागिरीत मोठा गोंधळ बघायला मिळाला. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा कार्यक्रमास विरोध आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे दाखवून या विरोधात निदर्शने दिली. यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री उदय सामंत यांनादेखील काळे झेंडे त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. वक्फ बोर्डाचे कार्यालय रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.




