मुख्य बातमी

जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची (जयगड) वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. ही सभा चेअरमन तबरेज अ. लतिफ सोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सभेसाठी व्हाईस चेअरमन सलीम इब्राहीम मिरकर, सदस्य शरद काशिनाथ चव्हाण, बशीर शेख महंमद होडेकर, अनिस महंमद आडुरकर, सिराज महंमद होडेकर, निसार महामुद जांभारकर, करीम महंमद जांभारकर, श्रीमती मसुदा शौकत डांगे, श्रीमती गजाला अफताब संसारे, कर्मचारी मुनताहा म. शरीफ टेमकर,(सचिव), सईद महामूद सोलकर, श्रीमती सिमिन निजामुद्दीन मुल्ला, संस्था सभासद सर्वश्री अनिरुद्ध कमलाकर साळवी, शराफत अ. करीम गडबडे, रवींद्र पांडुरंग पोटफोडे, नासीर संसारे, रिझवान वाडकर, फारुक संसारे, बिलाल आडुरकर, इनायत शिरगावकर, प्रमोद प्रभाकर घाटगे, फतेह महंमद मुजावर, समद खोलीकर, कमलाकर बोरकर, दीपक पवार, अलिमिया टेमकर, गजानन सावंत, देवदास चव्हाण, जुबेर सांगरे, फैजल मुजावर, अब्दुल रहेमान संसारे, शकील संसारे, एजाज सोलकर, हिदायत होडेकर, मुबीन नेवरेकर, बदृद्दिन जांभारकर, मेहबूब नेवरेकर, सरफराज संसारे आदी प्रमुख मच्छीमार सभासद उपस्थित होते.

सर्व सदस्यांचे स्वागत संस्थेचे सचिव मुन्ताहा टेमकर यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व विषयांवर साधकबाधक चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. चहापान,अल्पोपहार झाल्यावर अनिरुद्ध कमलाकर साळवी यांनी आभारप्रदर्शन केले. यानंतर राष्ट्रगीत होवून सभेचे कामकाज संपन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button