मुख्य बातमी

रत्नागिरीकरांसाठी निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम

रत्नागिरी : शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र येथे निःशुल्क योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हा अभ्यासक्रम १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत सायंकाळी ५ ते ५.३० या वेळेत घेतला जाणार आहे.

ह्या अभ्यासक्रमात आसने, प्राणायाम घेण्यात येणार असून योग प्रात्यक्षिकांचे पद्धतशीर ज्ञान रत्नागिरीकरांना मिळणार आहे. हा अभ्यासक्रम मोफत असल्याने केवळ आपल्याला वेळेची गुंतवणूक करावी लागणार आहे. कामाच्या व्यस्ततेतून आपल्या आरोग्यासाठी वेळ देण्याची ही सुवर्ण संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. हा अभ्यासक्रम अरिहंत मॉल येथील रत्नागिरी उपकेंद्रात होणार आहे.

इच्छुकांनी ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क त्वरित साधावा. तसेच पुढील लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.  https://forms.gle/9beGKFyu7hzipDBA7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button