राजापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ३० सप्टेंबर रोजी भरती मेळावा

रत्नागिरी : बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याचे आयोजन ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूर येथे करण्यात आले आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तिमथ्य शरद मिसाळ यांनी केले आहे.
या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी आस्थापनांसह सहकारी संस्थाकडील विविध आस्थापना २५०० पेक्षा अधिक पदासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीची निवड करणार आहेत.
उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचे ५ बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी रत्नागिरी जिल्हा कौशल्य रोजगार व नाविन्यता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे करावी. नाव नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार यांच्याकडे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५३-२९९२६०, मोबाईल क्रमांक ९४२३८२६३७१/९१५८१३०३२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.



