पेडणे बोगद्याची चाचणी यशस्वी

रत्नागिरी : तब्बल साडेसतरा तासांच्या अथक प्रयत्नानंतर कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यातील अडचणीवर मात करण्यात कोकण रेल्वेला यश आले असून, ८.३५ वाजता बोगद्यातील रुळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. लवकरच वाहतूक पूर्ववत होईल, असा दावा कोकण रेल्वे प्रशासनाने केला आहे.
सिंधुदुर्ग – गोवा हद्दीवर असलेल्या पेडणे बोगद्यात काल (९ जुलै) दुपारी जमिनीतून पाणी आल्याने रुळ पाण्याखाली गेले होते. रात्री १०.३० च्या सुमारास इथून गाडी सोडण्यात आली होती; मात्र मध्यरात्री पुन्हा बोगड्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली होती. तसेच अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून तब्बल १०० कामगार युद्धपातळीवर काम करत होते.
आता आज (१० जुलै) रात्री ८.३५ वाजता या रुळाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे लवकरच कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू होईल, असा दावा कोकण रेल्वेने केला आहे.



