Uncategorized

भारतीय तटरक्षक दलातर्फे आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिवस साजरा

भाट्ये किनाऱ्यावर स्वच्छ्ता मोहीम : ४५० किलो कचरा जमा

रत्नागिरी : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या जगभर साजरा केला जातो. याद्वारे वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण करण्यासाठी आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवली जाते. यावर्षी, भारतीय तटरक्षक रत्नागिरीने आंतरराष्ट्रीय सागर तट स्वच्छता दिनानिमित्त शहराजवळील भाट्ये बीचवर आज (२१ सप्टेंबर) सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छ्ता मोहिमेचे आयोजन केले.

यावेळी मत्स्यव्यवसाय विभाग, सागरी पोलीस, कस्टम्स, एनसीसी कॅडेट्स, इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या एनएसएस सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रासाठी सहभागींमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर डीआयजी गिरीश चंदर यांच्या हस्ते झाले. यावेळी तटरक्षक अवस्थान यांचे बरोबरच तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी यांचे सर्व अधिकारी व जवान यांनी या कार्यक्रमाचे हिरारीने नियोजन केले आणि सहभाग नोंदवला. याव्यतिरिक्त कार्यक्रमात विविध संस्थांचे व शाळांचे सुमारे ३०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.

कार्यक्रमादरम्यान एकूण ४५० किलो कचरा जमा करण्यात आला. बायोडिग्रेडेबल कचरा आणि इतर पुनर्वापर करण्यायोग्य प्लास्टिक स्वतंत्रपणे गॅश बॅगमध्ये गोळा केला गेला. कचरा वर्गीकरण करून पुढील विल्हेवाटीसाठी नगर पालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button