मुख्य बातमी

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना;प्रधानमंत्री साधणार लाभार्थ्यांशी संवाद

प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने लाभार्थ्यांना शुक्रवारी प्रमाणपत्र वाटप

रत्नागिरी : येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (मुलींची) २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा प्रथम वर्धापन दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा होणार आहे. हा वर्धापन कार्यक्रम वर्धा येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पाडणार आहे. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योजनेतील लाभार्थ्यांशी ऑनलाईन पध्दतीने विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर TC 226200 येथून संवाद साधणार आहेत.

यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी येथे प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांनी २० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) रत्नागिरी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button