७, १२ आणि १७ सप्टेंबर रोजी मद्य विक्री बंद

रत्नागिरी : दि. ७ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी, १२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
या वर्षी ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ चे कलम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी शनिवारी (७ सप्टेंबर) श्री गणेश चतुर्थी, गुरुवारी (१२ सप्टेंबर) ज्येष्ठा गौरी विसर्जन आणि मंगळवारी (१७ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी या तीनही दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, यामधे कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.



