मुख्य बातमी

पिडीत तरुणीला लवकरात लवकर न्याय देण्याची महाविकास आघाडीची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन सादर

रत्नागिरी : पिडीत तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळावा, या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना देण्यात आले.

चंपक मैदान येथे २६ ऑगस्ट रोजी नर्सिंगचे प्रशिक्षण घेणारी तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी जलद तपास करून पिडीत तरुणीचा गुन्हेगार लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याला शिक्षा करावी आणि अत्याचारित तरुणीला लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी पोलिसांचा तपास सर्व बाजूंनी सुरू असून, सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. शक्य असेल तिथे तंत्रज्ञानाचा वापर करून पुरावे शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उप जिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुका प्रमुख अभय खेडेकर, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, उपशहर प्रमुख नितिन तळेकर, बावा चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रांतिक सदस्य कुमार शेट्ये, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक संध्या कोसूंबकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button