कोकण रेल्वेची वाहतूक दोन तासांनंतर सुरळीत
ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दीलाही फटका

रत्नागिरी : रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन सोमवारी (२६ ऑगस्ट) सकाळी बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी (२६ ऑगस्ट) सकाळी रेल्वे वाहतूक दोन तासांपेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती.
रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेसलाही फटका बसला. सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी एक्स्प्रेस तसेच मुंबईच्या दिशेने धावणारी कोचुवेली -एलटीटी गरीब रथ एक्स्प्रेस या गाडीसह अन्य काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. मार्गावर बंद पडलेले देखभाल इंजिन सकाळी १०:२४ वाजता बाजूला करण्यात आल्यावर रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली.



