मुख्य बातमी

रत्नागिरी शहरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : शहरातील टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज असलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. टिळक आळी येथील श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान येथे त्रिपूर प्रज्वलित करतानाच परिसरातील अबालवृद्धांनी एकत्र येत देवस्थान आणि लोकमान्य टिळक जन्मस्थान परिसरात हजारो दीप लावले. मंडळाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यानिमित्त या दीपोत्सवाचे आयोजन केले होते.

दरम्यान, आज संध्याकाळनंतर रत्नागिरीत पावसाचे सावट होते. अनेक ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. मात्र तरीही शहरातील श्री कालभैरव देवस्थान (भैरी मंदिर), राजीवडा, मारुती मंदिर तसेच तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे आदी ठिकाणी दीपोत्सवानिमित्त त्रिपुर प्रज्वलित केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button