मुख्य बातमी
अणुस्कुरा घाटातील दरड दूर करण्यात मोठ्या दगडांचा व्यत्यय
रस्ता मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

राजापूर : आज (२४ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास अणुस्कुरा घाटातील पिकनिक स्पॉटपासून वरच्या बाजूला काही अंतरावर दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या सात तासांपासून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहेत; मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठ-मोठे असलेल्या दगडांमुळे रस्ता मोकळा करण्याच्या कामामध्ये सातत्याने व्यत्यय येत आहे.
जेसीबी आणि तीन डंपरच्या सहाय्याने घाटमार्ग मोकळा करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यामध्ये मोठमोठ्या असलेल्या दगडांमुळे आज पूर्णपणे वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होण्याची शक्यता कमी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.



