मुख्य बातमी

“निर्भय बनो”तर्फे रत्नागिरीत २४ ऑगस्टला कार्यकर्ता जनजागर सभा

ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत ज्ञानेश महाराव यांचे विचार ऐकण्याची संधी

रत्नागिरी : “निर्भय बनो” रत्नागिरीच्या वतीने कार्यकर्ता जनजागरसभेचे आयोजन शनिवारी शहरातील जयस्तंभ येथे बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले आहे. या सभेत ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत ज्ञानेश महाराव उद्बोधित करणार आहे.

येत्या महिनाभरात राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत “निर्भय बनो”तर्फे परिवर्तनाचा जागर या कार्यकर्ता सभेत केला जाणार आहे. या सभेच्या निमित्ताने ज्ञानेश महाराज यांचे विचार ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. ही सभा २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जयस्तंभ रत्नागिरी येथील बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणार आहे.

या सभेला रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक अभिजीत हेगशेट्ये दीपक राऊत कुमार शेट्ये, ऍड. अश्विनी आगाशे, बशीर मुर्तुझा, नौसीन काझी, राधा वणजू, विनोद वायंगणकर, सुकुमार शिंदे, पल्लवी सावंत, वाय. डी. पवार, विवेक घटविलकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button