मुख्य बातमी

प्रतिपालकत्व योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत प्रतिपालकत्व ही योजना राबविण्यात येते. ६ ते १८ वयोगटातील निरीक्षण गृह व बाल गृहात दाखल बालकांना कुटुंब मिळवून देणे, हा या योजनाचा उद्देश आहे. ज्या पालकांना प्रतिपालकत्व योजनेतून संगोपन करण्यासाठी बालक घेण्याची इच्छा आहे, अशा पालकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा प्रतिपालकत्व समितीचे सदस्य सचिव श्रीकांत हावळे यांनी केले आहे.

बाल न्याय (बालकांची काळजी व सरंक्षण) अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत प्रतिपालकत्व ही योजना राबविण्यात येते. प्रतिपालकत्व योजनेनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना त्यांना कौटुंबिक वातावरणाचा हक्क मिळविण्यासाठी काळजी घेणाऱ्या संस्थांमधून कुटुंबात किंवा कौटुंबिक वातावरणात पुनर्स्थापित करण्यासाठी बालकाला कुटुंबात देण्यात येते.

ज्या पालकांना प्रतिपालकत्व योजनेतून संगोपन करण्यासाठी बालक घेण्याची इच्छा आहे, अशा पालकांनी www.wcdcommpune.org.in/fostercare या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी वीर (९२२५८९२३२५), प्रदीप मांडवकर संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष (९९७०३८४२८८), कार्यालयीन क्रमांक (०२३५२) २२०४६१ वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button