श्री माऊली महिला भजन मंडळाला भजन साहित्य भेट

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहरानजीकच्या कुवारबाव भागातील श्री माऊली महिला भजन मंडळाला वस्तुरूपी अमूल्य भेट दिली आहे.
या मंडळाने आजवर अनेक भजने जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील ठिकाणी करत यशाची वेगळी उंची गाठली आहे. त्यातच विविध सामूहिक गायन स्पर्धांमध्ये भाग घेत या मंडळाने क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे भविष्यात देखील या मंडळाला सुगीचे दिवस यावेत यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मंडळाला वस्तुरूपी भजन साहित्य भेट देण्यात आलेली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या या निर्णयाबाबत मंडळातील सर्व महिलांनी समाधान व्यक्त करत आनंद साजरा केला आहे.
शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू म्हाप, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्विय सहाय्यक नेताजी पाटील, शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित तोडकर, महिला विभाग प्रमुख बोरकर, उपविभाग प्रमुख स्नेहल वैशंपायन शाखाप्रमुख अरुण पाटील, माजी सरपंच विनोद झाडगावकर, सर्व पदाधिकारी मेहबूब जमादार, प्रशांत पवार, रोहन शिंदे, या मान्यवरांच्या हस्ते ही वस्तूरूपी भेट श्री माऊली महिला भजन मंडळाला देण्यात आली.
यावेळी मंडळातील मधुरा काणे, अंकिता तोडकरी, सुवर्णा जंगम, सुनिता तेली , प्रज्ञा देसाई , वैभवी पावसकर , नेहा शिंदे ,रत्नप्रभा भडेकर, शोभा पाटील, शुभांगी पाटील, रेखा कोळेकर, सुप्रिया तोडकरी, सविता देसाई आदी महिला उपस्थित होत्या.



