साळवी स्टॉप परिसर रत्नागिरीला जोडण्यासाठी भाजपाचे विद्युत विभागाला निवेदन

रत्नागिरी : वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याला कंटाळून साडी स्टॉप परिसरातील नागरिकांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दाद मागितली होती. त्याची दखल घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन त्यांना साळवी स्टॉक परिसर रत्नागिरी युनिटला जोडण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
शहरातील साळवी स्टॉप परिसर हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) जोडलेला आहे. त्यामुळे या परिसरात सतत वेगवेगळ्या कारणांमुळे सतत विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांना याचा फार त्रास होत आहे. त्यामुळे विद्युत विभागाबाबत नाराजी पहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक चार, पाच, सहा या भागांतील कार्यकर्त्यांनी याबाबत जिल्हाध्यक्ष यांच्याकडे प्रश्न मांडला होता. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी याबाबत तातडीने निर्णय घेत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट देत जाब विचारला व या परिसरातील लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा, हा परिसर रत्नागिरी शहर युनिटला जोडला जावा जेणेकरुण नागरिकांना सततच्या विद्युत पुरवठा खंडीत होत असलेल्या त्रासापासून दिलासा मिळेल. विद्युत विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, नितीन गांगण, मंदार खंडकर, शैलेंद्र बेर्डे, प्रसाद बाष्ठे, संजीव बने, राजू भाटलेकर, तुषार देसाई, सौ. सायली बेर्डे आधी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.



